Not only should Nehru Stadium be visited, but also K. G. Gupta and Sons Snacks Bar 1,2 (Shiv Bhojan Thali #701). If you have never tried Indian cuisine, you should order a table at this restaurant.
महाविकास आघाडी ची एक कामगिरी म्हणजे शासन कसं असावं ह्याची प्रचिती. 10 रुपयात जिथे साधा वडापाव मिळत नाही, तिथं त्या सरकारने 10 रुपयात गोर गरीब, कष्टकरी लोकांना संपूर्ण जेवण दिलं. जेवण छान असतं हे मी अनुभवातून सांगतोय. बोर्ड दिसलं स्वारगेट च्या st स्टॅन्ड वर. गुप्ताजीच्या कॅन्टीन वर, म्हटलं खाऊन तर बघु नक्की काय देतायत ते तरी समजेल. पण खरोखर जेवण मस्त होतं. आणि कँटीन मालक गुप्ताजी सुद्धा स्वतः हुन लोकांना सांगत होता. उद्धव ठाकरे आणि आणि त्यांच्या सहकारी पक्षांना द्यावे तितके धन्यवाद कमी आहेत. गरिबांची दुवा आहे त्यांच्या सोबत. दुवा आहेत असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा खरच लोकं जेवताना आशीर्वाद देत होते. फक्त एकच विनंती जेवणाची ताटे वाढवावीत. सध्या दिवसाला फक्त 150 थाळ्या आहेत. किमान 300 तरी कराव्यात. हया सरकारात ते शक्य दिसत नाही. महाविकास आघाडी आली कि होईल कदाचित.